गुरुंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकजूट दाखवण्याची गरज - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरूंचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्र येणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातच्या कच्छमध्ये गुरुद्वारा लखपत साहिब इथं गुरुनानक देव यांच्या गुरु पर्व कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. दर वर्षी 23 ते 25 डिसेम्बर या काळात गुरुद्वारा लखपत साहिब इथं गुरु नानक देव यांचा गुरुपर्व उत्सव साजरा केला जातो. आपल्या यात्रेमध्ये गुरु नानक देव लखपत इथं थांबले होते. गुरू नानक देव आणि अन्य गुरूंनी देशाला मजबूत केलं, असं मोदी यांनी सांगितला दहावे गुरु गोविंदसिंह यांचं जीवन म्हणजे संघर्ष कथा आहे, असा प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. शीख गुरूंनी देश आणि धर्मासाठी प्राणांची बाजी लावली असे प्रशंसोद्गार मोदी यांनी यावेळी काढले.  आपल्याला दिल्लीत आल्यावर गुरूंची सेवा करायची संधी मिळाली, असं ते म्हणाले. एक भारत श्रेष्ठ भारत हाच देशाचा आजचा मंत्र आहे असा, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.