देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले ३ कोटी ४० लाख ९७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोना मुक्तीदर ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के इतका झाला असून, तो मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यातल्या कोरोना मुक्तीदरापेक्षा जास्त आहे.