महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं राज ठाकरेचं मत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. बडतर्फ मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं का ठेवली याचं उत्तर मिळायला हवं होतं, मात्र तसं न होता आपण भाकित केल्याप्रमाणेच हे प्रकरण वेगळ्याच दिशेनं वळवलं गेलं, आपण अभिनेत्याच्या मुलाविषयीची बातमी अनेक दिवस चालवतो, पण त्याचवेळी देश सोडून गेलेल्या उद्योजकांमुळे नोकऱ्यांवरही परिणाम झाला आहे, त्याविषयी चर्चाही करत नाही अशी टीका त्यांनी केली. ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला गोंधळ हा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.