संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारताकडे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. सुमारे 10 वर्षानंतर भारताकडे हे अध्यक्षपद आलं आहे. अमेरिकेत 11 सप्टेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, 28 सप्टेंबर 2001 रोजी सुरक्षा परिषदेनं एक ठराव करून दहशतवाद विरोधी समितीची स्थापना केली होती. या ठरावानुसार सर्व देशांना दहशतवाद रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.