देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२७ व्या दिवशी देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२९ कोटी ७१ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४९ कोटी १ लाखाहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही आज दुपारपर्यंत ३ लाखांहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत राज्यभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२ कोटी ४ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ४ कोटी ३८ लाखाहून अधिक नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.