देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधले जावेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं धुळ्यात प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश आणि राज्यांच्या भरभराटीसाठी महामार्ग आधी बांधायला हवेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं शिवस्मारक आणि महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहोळ्यामधे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्र राजे भोसले यावेळी उपस्थित होते. दोंडाईचा इथल्या शहीद अब्दुल हमीद स्मारक, पर्यटन विभागाच्या माध्यमातून साकारलेला राजपथ, देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत मार्ग, दोंडाईचा संस्थांचे शेवटचे राजे दौलत सिंह रावल यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहोळा देखील आज राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झाला.