फिरकीपटू हरभजन सिंगची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिरकीपटू हरभजन सिंग यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ४१ वर्षीय हरभजन यांनी १९९८ साली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हरभजननं आपल्या फिरकीच्या जोरावर १०३ कसोटी सामन्यात आतापर्यंत ४१७ बळी घेतले आहेत. तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६९ आणि टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये २५ बळी घेतले आहेत. हरभजननं आयपीएलमध्ये १५० बळी घेतले आहेत.