बचावात्मक पवित्रा सोडून भारत आक्रमक दृष्टीकोनाकडे- मार्शल विवेक राम चौधरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आण्विक युद्धाचा धोका गृहीत धरून, भारत युद्धातल्या बचावात्मक पवित्र्यापासून दूर जात आक्रमक दृष्टीकोनाच्या दिशेने बदलू लागला असल्याचं हवाई दलाचे प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. याबाबतीत भारत मागे राहू नये यासाठी आपण धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि स्थानिक पातळीवरच्या कृतींचं पुनर्मूल्यांकन करायची गरज त्यांनी अधोरेखीत केली. भारताच्या सीमा अस्थीर शेजाऱ्यांनी ग्रासलेल्या आहेत, ज्यामुळे भविष्यात लष्करी हल्ल्यासह आर्थिक, राजनैतिक आणि इतर स्वरुपातल्या हल्ल्याचा धोका कायम आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वच आघाड्यांवर तयारीत राहायला हवं असं ते म्हणाले.