राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाला मर्यादा असल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं, मात्र पुढचं अधिवेशन नागपुरातच होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.

या अधिवेशनात एसटी संप, पेपरफुटी आणि विविध मुद्यांवर चर्चा होईल, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याची सरकारची तयार आहे, असं ते म्हणाले. या अधिवेशनात महिलांच्या सुरक्षिततेच्या शक्ती फौजदारी कायद्याचं विधेयक मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.