चारधाम प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधे रस्त्यांची रुंदी वाढवून दोन मार्गिका करायला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चारधाम प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधे रस्त्यांची रुंदी वाढवून दोन मार्गिका करायला सर्वोच्च न्यायालयानं मंजूरी दिली आहे. ८९९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाअंतर्गत रस्तारुंदीकरणासाठी परवानगी मागणारी याचिका संरक्षण मंत्रालयानं दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सूर्यकांत आणि विक्रमनाथ यांच्या पीठानं हा आदेश दिला. याआधी २०२० मधे न्यायालयानं केंद्रसरकारला साडेपाच मीटरपर्यंत रस्ता रुंदीकरणाला परवानगी दिली होता. या आदेशात दुरुस्ता करण्याची विनंती संरक्षणमंत्रालयानं याचिकेत केली होती, त्यानुसार आता हा मार्ग १० मीटर रुंद करण्याची परवानगी आता न्यायालयानं दिली आहे.