राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज विरोधकांनी गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं, या मागणीचा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. त्यावरून गोंधळ झाल्यानं सभापतींनी कामकाज स्थगित केलं. यावर्षी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीअर्थात ११ ऑगस्ट रोजी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हिंसा आणि असभ्य वर्तन केल्याबद्दल या सदस्यांना सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं होतं.