पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' मोहिमेत मुदतवाढ

 

पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी जागरूक राहून लवकरात लवकर आपलं लसीकरण पूर्ण करावं असं आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे. गरज पडली तर शिवाजीनगर इथलं जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेनं तयार सुरू केली आहे.