मुंबईत ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत महानगरपालिकेची नवी नियमावली जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन विषाणूमुळे मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आगामी ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार नागरिकांना तसंच सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना कोविड सुसंगत वर्तणूक सक्तीची करण्यात आली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्याचं आवाहन सरकार आणि प्रशासन वारंवार करत असून देखील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोविड प्रतिबंधक नियमावलीचं उल्लंघन होत आहे. गर्दीवर नियंत्रण करण्याची आवश्यकता असल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितलं. नव्या नियमावलीनुसार २०० पेक्षा जास्त माणसं एकत्र येण्याकरता महापालिकेच्या  संबंधित वॉर्डच्या उपायुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे. तसंच खुल्या जागेत २०० पेक्षा जास्त माणसं एकत्र येणार असतील तर कोविड प्रतिबंधक नियमावलीचं पालन होत आहे ना यावर देखरेख ठेवण्यासाठी  महापालिकेचे प्रतिनिधी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील. बंद जागेत ५० टक्के क्षमतेनं तर खुल्या जागेत २५ टक्के क्षमतेनं कार्यक्रम आयोजित करता येतील. असं चहल यांनी सांगितलं. 

 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image