संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला- राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या लोकलेखा समितीमुळे संसदीय व्यवस्थेत विवेक, ज्ञानासक्ती आणि शिष्टाचार टिकून राहिला असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेच्या लोकलेखा समितीच्या शताब्दी महोत्सवाला संबोधित करत होते. सार्वजनिक जीवन निर्मळ असावं यासाठी व्यवहारांची नोंद महत्वाची असल्याचं महात्मा गांधी यांचं मत होतं असंही राष्ट्रपतींनी अधोरेखीत केलं. उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकलेखा समीतीच्या अहवालांतून व्यवस्थेत नियमीतपणे सुधारणा केल्या जातात. आजवर समीतनं अनेक आर्थिक त्रूटींचा शोध लावून त्या सुधारण्याचं काम केलं आहे असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. एका वर्षात संसेदेत किमान १०० दिवसांचं कामकाज व्हायला हवं असंही नायडू यांनी यावेळी सुचवलं. लोकलेखा समिती ही संसदेचा सर्वात महत्वाचा घटक असून, समितीच्या सदस्य समर्पण वृत्तीनं काम करत आहेत अशा शब्दांत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image