राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच न्यालयाच्या न्यायाधीश ए .एम . खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सी टी रवीकुमार यांच्या खंडपीठानं राज्यात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. गेल्या ७ वर्षांपासून राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय पशुधनाचं संरक्षण, संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या हिताचा ठरेल असं पवार म्हणाले विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली असून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे असंही ते म्हणाले. हे यश शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल, असं पवार यांनी म्हटल आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर घटनापीठ पुन्हा विचार करणार असून तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या पाठपुराव्यानं बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात अखेर परवानगी मिळाली आहे. बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्याचे बैलगाडा प्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पुर्तता आज झाली असून या निर्णयामुळे मी समाधानी असून आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.