राज्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’अभियानांतर्गत हे उपक्रम राबवले जातील. यात विद्यार्थी आणि शिक्षक सहभाग घेऊ शकणार आहेत. या अभियानाच्या कालावधीत शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठीही उपक्रम राबवणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. याअंतर्गत विविध स्पर्धा, प्रदर्शनं, परिसंवाद आणि व्याख्यानं, तसंच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्रांचं आयोजन केलं जाणार आहे.