राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात दिली. महिला अत्याचाराचे राज्यात ३० हजार ५४८ गुन्हे दाखल झाले. अनेक घटनांमध्ये परिचितांकडूनच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. यापुढे अत्याचार करण्याचे धाडसच कुणी करु नये, अशी कडक तरतूद शक्ती विधेयकात केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ऑक्टोबर २०२१ पर्यंत राज्यात ७ हजार १८७ गुन्हे दाखल झाले. तसंच ८३३ जणांना अटक करण्यात आली आहे, असं ते म्हणाले. पेपरफुटी प्रकरणाबाबत विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय देण्यात येईल. पोलिसांच्या बदल्यांबाबत संपूर्ण पारदर्शकता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या ७५ पोलिस ठाण्याच्या नवीन इमारती उभारल्या जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री यांनी यावेळी केली. तसेच राज्यात १० नवीन पोलीस स्टेशन आणि ९०६ पदे नव्याने निर्माण करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.