प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेंबरला आकाशवाणीच्या मन कि बात कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी साधणार संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ डिसेम्बर रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन कि बात कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ८४ वा भाग असेल. २०२१ या वर्षातला हा शेवटचा कार्यक्रम असून यासाठी आपल्याला देशभरातल्या नागरिकांकडून विविध विषयांवर सूचना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १८००- ११- ७८०० या टोल फ्री क्रमांकावर हिंदी आणि इंग्रजी या भाषेत प्रधानमंत्र्यांसाठी आपला संदेश रेकॉर्ड करता येईल. २४ डिसेम्बरपर्यंत फोन लाईन खुल्या राहतील. मन कि बात हा कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन, AIR News संकेतस्थळ आणि मोबाईल ऍप वर तसंच  YouTube चॅनेल वर  प्रसारित केला जाईल.