विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं - राज्यपाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, केवळ विद्यार्थ्यांनीच नाही, तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ठाकूर विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावरच्या एक दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वतःचंही मूल्यांकन करायला हवं, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीला लागेल, असं ते म्हणाले.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image