उत्तरप्रदेशमध्ये देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशमध्ये आज देशात सर्वात जास्त दुग्धोत्पादन होत असून पशुपालन हा महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीमध्ये कारखियाओ इथल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या फूड पार्कमधल्या ‘बनास डेरी’ संकुलाची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. भारतामध्ये जगाच्या २२ टक्के दुग्धोत्पादन होत असून देशातल्या ८ कोटी जनतेची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं २ हजार कोटी रुपये किमतीच्या २७ विकास कामांचं उदघाटन केलं.