कोविड-१९ वर च्या कोरबेवॅक्स या आणखी एका देशी बनावटीच्या लसीला वापरासाठी अधिकृत मान्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ वरच्या कोरबेवॅक्स या आणखी एका देशी बनावटीच्या लसीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी तातडीच्या वापरासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. बायोलॉजिकल इ लिमिटेड या कंपनीनं ही लस विकसित केली आहे. जैव तंत्रज्ञान विभाग आणि त्या विभागाची बीआयआरएसी ही सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी यांनी या लसीच्या निर्मितीत साह्य केलं आहे. कोविड सुरक्षा मोहिमेअंतर्गत या लसीला वैद्यकीय आणि आर्थिक पाठबळ मिळालं आहे. दोन मात्रांच्या या  लसीचा साठा २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करावा लागतो. कोरबेवॅक्स ही सुरक्षित लस असल्याचं तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमधून सिद्ध झाल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं.