केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत सादर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक २०२१ आज प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत मांडलं. या विधेयकाचं उद्दिष्ट स्पष्ट नसल्याचं सांगत काँग्रेसचे सभागृहातले नेते अधिर रंजन चौधरी यांनी या विधेयकाला विरोध केला. हे विधेयक  भारतीय राज्यघटनेतल्या अनेक तरतुदींशी विसंगत असल्याचं मत काँग्रेसचे शशी थरुर आणि रिवोलिशनरी सोशलिस्ट पार्टीचे एन के प्रेमचंद्रन यांनी मांडलं. मात्र विरोध करणारे सदस्य हे विधेयक पूर्णपणे वाचण्याआधीच निष्कर्ष काढत आहेत, असं जितेंद्र सिंग म्हणाले. त्यांनी आज दिल्ली विशेष पोलीस आस्थापना सुधारणा विधेयकही सभागृहात मांडलं. केंद्रीय दक्षता आयोग आणि सीबीायच्या संचालकांचा कार्यकाळ एकावेळी एकवर्षापर्यंत वाढवण्याची तरतूद या विधेयकांमधे आहे.