राज्यात ओमायक्रॉनचे नवे २० तर कोविडचे नवे १ हजार ४१० रुग्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २० नवीन ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या, १०८ झाली आहे. काल आढळलेच्या रुग्णांमध्ये मुंबईतले ११, पुणे जिल्ह्यातल्या सहा, सातारा दोन, तर अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात काल एक हजार ४१० नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५४ हजार ७५५ झाली आहे. काल १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ४०४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ८६८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख एक हजार २४३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या आठ हजार ४२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.