केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या कोविड प्रतिबंधक लशींच्या १४८ कोटी ३७ लाख मोफत मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १४८ कोटी ३७ लाख मात्रा मोफत पुरवल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयनं ही माहिती दिली. यापैकी अद्याप न वापरलेल्या १७ कोटी ७२ लाखापेक्षा जास्त मात्रा राज्यं, केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णांलयाकडे उपलब्ध असल्याचं मंत्रालयनं सांगितलं.