कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपालांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. कतार मध्ये होणारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी राज्यपालांनी कतारला यावं, असं निमंत्रण अल-सुलैती यांनी यावेळी राज्यपालांना दिले. तसंच कतारच्या वाणिज्य दूतावासासाठी मुंबई इथं जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. कोरोना संसर्गाच्या काळात कतारने भारताला वैद्यकीय ऑक्सिजन निःशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्यपालांनी सुलैती आभार व्यक्त केलं. कतारने भारतात विविध क्षेत्रांत गुंतवणूक करून भारताच्या विकासात सहभागी व्हावं, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.