केंद्र सरकारची अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा येथे ५ लाखाहून अधिक AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अमेठी जिल्ह्यातल्या कोरवा इथे पाच लाखाहून अधिक  AK-203 रायफल तयार करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर योजनेला मोठं बळ मिळणार आहे.हा प्रकल्प रशियाच्या सहकार्यानं होणार असून त्यामुळे संरक्षण क्षेत्रातले भारत-रशिया संबंध अधिक दृढ होणार आहेत. या योजनेमुळे देशातल्या मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगातल्या कंपन्यांना लाभ होणार असून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. ३०० मीटर माऱ्याची क्षमता असलेली AK-203 रायफल वजनानं हलकी, परिणामकारक आणि आधुनिक तंत्रानंयुक्त असून भारतीय लष्कराचं बळ त्यामुळे वाढणार आहे. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image