वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, केंद्र सरकारचं राज्यसभेत निवेदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ राजेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. पहिलं मानवी अंतराळ गगनयान अभियान 2023 पर्यंत पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं. या अभियानाची नांदी म्हणून मानव विरहीत यान पुढच्या वर्षी पाठवलं जाणार आहे. कोरोनामुळे गगनयान अभियानाला विलंब झाल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी  चांद्रयान अभियानालाही पुन्हा सुरवात होणार आहे, असंही ते म्हणाले.