न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम मध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. न्युझीलंडनं भारताला सहा गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांच आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतानं शेवटच्या षटकात एक चेंडू शिल्लक ठेवत पार केलं. भारताच्या विजयात सुर्यकुमार यादवनं 62 धावा केल्या आणि कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. न्युझीलंडच्या मार्टीन गुप्टीलनं संघासाठी महत्त्वपूर्ण 70 धावांचं योगदान दिलं. दुसरा सामना रांची इथं उद्या खेळवला जाणार आहे. भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image