अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना मिळालेली नसून यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचं आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी केलं आहे. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आलेल आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गानं योग्य ती कार्यवाही केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.