कृषी कायदे रद्द करायच्या निर्णयाचं संयुक्त किसान मोर्चाकडून स्वागत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे रद्द करायच्या निर्णयाचं संयुक्त किसान मोर्चानं स्वागत केलं आहे. योग्य संसदीय प्रक्रियेतून या निर्णयावर अंमल होईपर्यत आम्ही प्रतीक्षा करू असं या संघटनेच्या नेत्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन हे फक्त कायदे रद्द व्हावेत यासाठी नव्हतं तर सर्व शेतकरी आणि सर्व कृषी मालाला कायद्यानं रास्त भावाची हमी मिळावी यासाठीचं आंदोलन असल्याची संयुक्त किसान मोर्चाची भूमिका आहे. वीज सुधारणा विधेयक रद्द करावं ही मागणीही मोर्चानं पुन्हा एकदा केली आहे. संसदेत ज्या दिवशी कृषी कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट भारतीय किसान संघटना पाहील, अशी प्रतिक्रिया भारतीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे. ते आज पालघरमध्ये बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रधानमंत्र्याच्या  निर्णयाचं स्वागत केलं केलं आहे. शेतकऱ्यांच्या भूमिकेचा हा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं.