ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी पॅकबंद वस्तूंसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं पॅकबंद वस्तूंसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.यामध्ये आकार निर्धारित करणारा नियम ५ वगळला असून आता पॅकिंग करण्यापूर्वी संबंधित वस्तूची असलेली किंमत विविध पॅक बंद वस्तूंच्या वेष्टनावर छापावी लागणार आहे. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना विविध उत्पादनांची तुलना करणं सोपं जाणार आहे. तसंच वस्तूच्या उत्पादनाची तारीखही जाहीर करावी लागणार आहे. वस्तूची किंमत सर्व करांसहित छापणंही आवश्यक करण्यात आलं आहे. हे नियम पुढच्या वर्षी एक  एप्रिलपासून लागू होतील.