शालेय शिक्षण विभागतर्फे "माझं संविधान, माझा अभिमान' उपक्रमाचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग २३ नोव्हेंबरपासून उद्या २६ नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत "माझं संविधान, माझा अभिमान' उपक्रम राबवत आहे.विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी भारतीय संविधानातल्या मूलतत्त्वांचा आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करावा, त्यासाठी राज्यघटनेतल्या मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसंच संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना व्हावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं शिक्षण संचालकांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.