स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील- चंद्रकांत पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील, अशी घोषणा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी काल सांगली जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची अचानक भेट गेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष संपवल्यामुळे गावागावात भाजपाची ताकद वाढली आहे, असं सांगून चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेचे लोक संख्येनं कमी आहेत. स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर जिल्हाध्यक्षांनी परस्पर घेऊ नये, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी अगोदर चर्चा करावी, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.