कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावलेल्या महिला आणि बालकांना यवतमाळ जिल्ह्यात मदत निधीचे धनादेश वितरीत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे घरातला कर्ता पुरुष गमावला आहे अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या बचतगटातल्या महिला आणि बालकांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शासनाच्या मदत निधीचे धनादेश वितरीत केले.कोरोनामुळे झालेली हानी गंभीर आहे, मात्र त्यामुळे खचून न जाता आपल्याला मिळणाऱ्या मदत निधीचा उपयोग  स्वयंरोजगारासाठी करून नव्यानं सुरुवात करायला हवी असं त्यांनी यावेळी लाभार्थ्यांना सांगितलं. कोरोनामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या बचत गटातल्या ३४ महिलांना एका स्वयंसेवी संस्थेनं प्रत्येकी ३० हजार रुपये तर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयानं कोविड मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या १० बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीचे धनादेश वितरित केले.