कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांना काळजीचं पत्र

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ चाचण्यांची साप्ताहिक संख्या कमी झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह काही राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या सणउत्सव, लग्नसमारंभ यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांनी मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या पत्रात म्हटलं आहे. चाचण्यांच्या संख्येची पातळी कायम राखल्याशिवाय एखाद्या भौगोलिक परिसरात संसर्गाची पातळी नेमकी किती आहे, हे ओळखणे अवघड असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात सरासरी दैनंदिन चाचण्यांची संख्या ९७,५०२ होती. या उलट १७ ते २३ मे या आठवड्यात २ लाख ६८ हजार ५०१ एवढ्या सर्वोच्च चाचण्या झाल्या होत्या. अकोला, अमरावती,बुलढाणा,धुळे, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार,वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केलेल्या पातळीपेक्षा कमी चाचण्या २२ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात झाल्या असल्याचं सांगत आरोग्य सचिवांनी चिंता व्यक्त केली.  वेळेवर निदान, संसर्गाची जोखमीची ठिकाणं तातडीनं ओळखून त्वरेनं उपाययोजना करण्यासाठी नियमित चाचण्या आवश्यक असल्याचं भूषण यांनी म्हटलं आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image