राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीआज सेना दलात विशेष कामगिरी बजावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांचं वितरणकेलं. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या समारंभात आपलं कर्तव्य बजावताना असामान्य साहस आणिसमर्पण दाखवणाऱ्या  सेना-कर्मीना  राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा पदक पुरस्कारानं  सन्मानित केलं. जम्मू-काश्मीरमध्ये एका मोहिमेतदहशतवाद्यांची योजना निष्फळ केल्याबद्दल  अभियांत्रिकीकोरचे  Sapper प्रकाश जाधव यांना मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.  पाच दहशतवाद्यांना ठार करूनमोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केल्याबद्दल मेजर विभूती शंकर ढोंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नायब सुभेदार सोमबीर यांना  जम्‍मू कश्‍मीर मधल्याएका अभियानात केलेल्या  असामान्य कामगिरीबद्दलमरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानंसन्मानित करण्यात आलं.  पाकिस्‍तानी एफ-16 लढाऊ विमानपाडल्याबद्दल ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह,लोकसभा अध्‍यक्ष ओम बिरला आणिसंरक्षण  राज्‍य मंत्री अजय भट्ट या समारंभालाउपस्थित होते.