अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी रशियावर अण्वस्त्र हल्ल्याचा सराव केल्याचा रशियाचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी या महिन्याच्या सुरुवातीला रशियावर अण्वस्त्र हल्ल्याचा सराव केल्याचा आरोप रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांनी केला आहे. दोन वेगवेगळ्या दिशेने रशियाच्या सरहद्दीच्या २० किलोमीटर आतपर्यंत ही विमानं आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. अमेरिकेनं मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. या सरावाची सार्वजनिक घोषणा करण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून हा सराव केला असल्याचं पेंटागॉननं म्हटलं आहे. युक्रेनच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव सुरु असतानाच रशियानं हा आरोप केला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image