टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा पराभव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेटी विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी २० विश्वचषकावर ताबा मिळवला आहे.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १७३ धावाचं आव्हान दिलं. केन विल्यमसनच्या ४८ चेंडूत ८५ धावांचं यात मोठं योगदान होतं. ७ चेंडू शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियानं २ गडी गमावून दिलेलं उद्दिष्ट साध्य केलं. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वार्नर ५३ तर मिशेल मार्शनं ७७ धावा केल्या. डेव्हिड वार्नरला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आलं तर मिशेल मार्श सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image