प्रधानमंत्री मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ८३ वा भाग असेल. इच्छुकांनी या कार्यक्रमात चर्चेसाठी आपले मुद्दे कळवावेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात केलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण आपली मतं नमो ॲप किंवा माय गव्ह द्वारे नोंदवू शकता. यासोबतच १८००- ११- ७८०० या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावरून आपलं मतं नोंदवता येईल. १९२२ क्रमांकावर मिस्ड कॉल करून मिळणाऱ्या लिंकवरूनही तूम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता. या सर्व फोन लाईन २६ तारखेपर्यंत सुरू राहतील.