मुंबईत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३१५ नवीन कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत या आजारानं बाधित व्यक्तींची एकूण संख्या ७ लाख ५५ हजार ९४७ इतकी झाली आहे. काल तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांचा एकूण आकडा १६ हजार २४७ वर पोहोचला. सध्या मुंबईत ३ हजार ८४९ कोविड ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ३३ हजार ३१८ इतकी आहे. मुंबईत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यावर पोहोचल्याचं मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.