चीन आणि अमेरिकेच्या राष्ट्रांध्यक्षामध्ये दोन्ही देशांतले संबंध आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची आज आभासी तंत्रज्ञानाच्या आधारे चर्चा झाली. बायडन यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते चीनच्या अध्यक्षांबरोबर बोलत होते. हवामान बदल आणि कोविड महामारी सारख्या जागतिक समस्यांवर तोडगा काढण्याकरता एकजुटीने प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर दोघांचं एकमत झालं. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य या नात्याने जगातल्या सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्थांनी परस्पर संबंध सलोख्याचे ठेवून उभयपक्षी हिताचा विचार केला पाहिजे असा मुद्दा मांडण्यात आला. उभयपक्षी संबंध सकारात्मक दिशेने पुढे नेण्यासाठी चीन अमेरिकेला सहकार्य करेल असं जिनपिंग यांनी सांगितल्याचं चीनच्या प्रसिद्धी विभागानं सांगितलं आहे. उभय देशातले ताण कमी करुन जागतिक शांततेसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image