हज यात्रेसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. हज यात्रेसाठी देशभरात पूर्वी २२ प्रस्थान केंद्र होती, मात्र २०२२ साली केवळ १० प्रस्थान केंद्रांवरून यात्रेकरू हजसाठी रवाना होतील अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची, श्रीनगर, दिल्ली, गोहाटी, कोलकाता, लखनौ आणि हैद्राबाद या शहरांचा यात समावेश आहे. हज यात्रेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे तसंच यासाठी मोबाईल ऍप तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हज यात्रेमध्ये ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर भर देण्यात आला असून स्वदेशी बनावटीच्या साहित्यासह यात्रेकरू हज साठी रवाना होतील असं नक्वी यांनी संगितलं.