देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स ११७० अंकांनी कोसळून ५८ हजार ४६६ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी ३४८ अंकांनी घसरुन १७ हजार ४१६ अंकांवर स्थिरावला. सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हापासूनच दोन्ही शेअर बाजारात घसरण दिसून आली.