देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ११ हजार ९०३ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात १ लाख ५१ हजार २०९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी, ४४ शतांश टक्के आहे.