सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार, तीन जखमी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एका जीपचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जण दगावल्याच आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १० वाजता झाला. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर प्रवास करणाऱ्या या जीप मध्ये ८ प्रवासी हेते. त्यापैकी चार गंभीर जखमी झाली आहेत.