मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना काल मुंबईच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फरार घोषित केलं आहे. अजामीनपात्र अटक वॉरंट बजावूनही सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्याची मागणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं न्यायालयाला केली होती. परमबीर सिंग ३० दिवसांच्या आत न्यायालयात हजर झाले नाहीत, तर त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली जाईल, असं विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी बातमीदारांना सांगितलं.