देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटी 41 लाख मात्रा देण्यात आल्या. काल 42 लाख 4 हजार मात्रा देण्यात आल्या. काल 8 हजार 309 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. देशात सध्या 1 लाख 3 हजार 859 कोविड रुग्ण उपचाराधीन आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या एक टक्क्याहून कमी असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98 पूर्णांक 34 शतांश टक्के असून मार्च 2020 पासूनचा सर्वात उच्चांकी दर आहे. काल 9 हजार 905 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 3 कोटी 40 लाख 8 हजार 183 झाली आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 85 शतांश टक्के असून गेले 15 दिवस हा दर एक टक्क्यांहून कमी आहे. कोविड दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर एक पूर्णांक 9 शतांश टक्के असून  गेले 56 दिवस हा दर दोन टक्क्याहून कमी आहे. आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 64 कोटी 2 लाख चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 लाख 68 हजार 790 झाली असून गेल्या 24 तासात 236 बाधितांचा मृत्यू झाला.