राज्यात सुमारे २ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सुमारे २ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्या १ हजार ६०० रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल ४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या २६ हजार ८०० रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातले १ हजारापेक्षाही कमी रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर सुमारे २ लाख १० हजार व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. काल सर्वाधिक ६१५ रुग्ण मुंबई विभागात आढळले तर सर्वात कमी म्हणजे १३ रुग्णांची नोंद नागपूर विभागात झाली. एकट्या नगर जिल्ह्यात काल १० रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला नागपूर विभागात मात्र कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.