मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सिंग यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात अखिल भारतीय आर्यु विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे. तापामुळे त्यांना अशक्त पणा आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी एम्समध्ये जाऊन मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा त्यांनीही नंतर ट्विटरवर व्यक्त केली.