१२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील १२ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत, सहव्याधी असलेल्या मुलांचे लसीकरण प्रथम  करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानंतर निरोगी मुलांचे लसीकरण करण्यात येईल असं राष्ट्रीय लसीकरण सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी म्हटलं आहे. सध्या अशा सहव्याधी असलेल्या मुलांची यादी करण्याचं काम सुरु असून ती लवकरच जनतेला उपलब्ध होईल असं ते म्हणाले. गंभीररित्या आजारी असलेल्या मुलांना लस घेण्यासाठी जास्त प्रवास करावा लागू नये, यासाठी त्यांची लसीकरण नोंदणी त्यांच्या घराजवळच्या केंद्रात करण्याची काळजी घेतली जाईल, असं ते म्हणाले.  भारतीय औषध महानियंत्रकांनी ऑगस्ट मध्ये झायडस कॅडीला या कंपनीने तयार केलेल्या  डी  एन ए लसीला १२ वर्षावरच्या मुलांसाठी व मोठ्यांसाठी आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image